Soyabean Market : भारतात सन २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे (Soyabean Production) उत्पादन १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोयाबीनची मासिक बाजारात आवकमध्ये एप्रिल २०२४ पासून वाढ झाली आहे. तर आगामी डिसेंबरपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean Market) कसे असतील, हे सविस्तर पाहुयात....
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे (Soyabean farming) मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयावीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किंमतीवर परिणाम होत असतो.
सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२२-२३ मध्ये सोयावीन तेलाची आयात कमी झाली आहे. चालू वर्षी नोव्हेबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीतीत २७.१४ लाख टन सोयातेलाची आयात झाली आहे. भारतात सन २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्केनी अधिक आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोयाबीनची मासिक बाजारात आवकमध्ये एप्रिल २०२४ पासून वाढ झाली आहे.
मागील तीन वर्षांतील बाजारभाव
अमेरिकन कृषी विभागाच्या, (WASDE, सप्टेंबर २०२४) अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये जगात ४२९२ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८.५ टक्क्यांनी (३९४८ लाख टन, २०२३-२४) अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ४८९२ रुपये प्रति क्विंटल आहे. तर मागील तीन वर्षातील ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीतील महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ मध्ये ५९८० रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोवर ते डिसेंबर २०२२ मध्ये ५४२५ रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये ४८५४ रुपये प्रतिक्विंटल
डिसेंबरमधील संभाव्य किंमती.....
सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या 'निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते जून २०२४ मध्ये ४.९७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते ऑगस्ट २०२४) भारतातून ८.४९ लाख टन निर्यात झाली आहे. ही मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 च्या वेळी लातूर बाजारातील संभाव्य किंमती या 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल ते 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असतील.
संकलन : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे.
Harbhara Market : ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हरभरा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर