Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Last Week Soyabean Market Price) सरासरी किंमत ४६९७ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत २.५ टक्के वाढ झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या (Latur Soyabean Market) किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत ४८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील बाजारपैकी सोयाबीनच्या आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात सरासरी किंमती ४६९७ रुपये अशा सर्वाधिक होत्या. तर वाशीम बाजारात क्विंटलमागे सरासरी ४४५० रुपये होत्या.
साप्ताहिक बाजार अहवालानुसार सप्टेंबर महिन्यापासूनच्या किमती पाहिल्या तर एक सप्टेंबर रोजी ४ हजार ३९० रुपये प्रतिक्विंटल, ०८ सप्टेंबर रोजी ४ हजार ४४० रुपये, १५ सप्टेंबर रोजी ४ हजार ५०० रुपये , तर २२ सप्टेंबर रोजी हाच दर ०४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचला आहे. यात मध्य प्रदेशातील इंदोर येथे ०४ हजार ६१३ रुपये, अकोला बाजारात ४ हजार ५०८ रुपये, अमरावती बाजारात ४ हजार ५६६ रुपये, वाशिम बाजारात ४ हजार ४५० रुपये आणि लातूर बाजारात ४ हजार ४९७ रुपये दर मिळाला.
आवक कशी राहिली?
तर साधारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या आवकेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ०८ सप्टेंबरपासून ते १५ सप्टेंबर पर्यंत आवक वाढत गेली असून २० हजार टनांपर्यंत आवक झाली आहे. तर २२ सप्टेंबरपर्यंत ही आवक २२ हजार टनांपर्यंत पोहोचले आहे.