Soyabean Market : मागील आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत रु. ४२५८ प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ४% वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची (Soyabean Market) आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ५८ टक्केनी घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनची आवक २० टनांच्या खाली राहिली आहे. तर देशात जूनमध्ये १०० टन, जुलैमध्ये ८० टन, ऑगस्टमध्ये हा आकडा थेट ४० टनांवर येऊन पोहोचला आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४४४६/क्रिव.) तर इंदोर बाजारात सरासरी किंमती रु. ४१८७/ रूपये प्रतिक्विंटल. होत्या.
यात मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजार ४१८७ रुपये, अकोला बाजारात ०४ हजार २५८ रुपये, अमरावती बाजारात ०४ हजार 309 रुपये, वाशिम बाजारात ४ हजार २६४ रुपये, तर लातूर बाजारात ०४ हजार ४४६ रुपये दर मिळाला होता.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/09/2024 | ||||||
कारंजा | --- | क्विंटल | 200 | 4040 | 4540 | 4040 |
तुळजापूर | --- | क्विंटल | 40 | 4600 | 4600 | 4600 |
मेहकर | लोकल | क्विंटल | 130 | 4000 | 4575 | 4300 |
चिखली | पिवळा | क्विंटल | 70 | 4000 | 4350 | 4175 |
देउळगाव राजा | पिवळा | क्विंटल | 3 | 4300 | 4300 | 4300 |
निलंगा | पिवळा | क्विंटल | 40 | 4400 | 4600 | 4500 |