Join us

Soyabean Market : सोयाबीन आवकेत 58 टक्क्यांची घट, बाजारभाव एमएसपीपेक्षा कमीच! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 4:27 PM

Soyabean Market : मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ४ टक्के वाढ झाली आहे. मात्र या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

Soyabean Market : मागील आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत रु. ४२५८ प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ४% वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची (Soyabean Market) आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ५८ टक्केनी घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनची आवक २० टनांच्या खाली राहिली आहे. तर देशात जूनमध्ये १०० टन, जुलैमध्ये ८० टन, ऑगस्टमध्ये हा आकडा थेट ४० टनांवर येऊन पोहोचला आहे. 

मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४४४६/क्रिव.) तर इंदोर बाजारात सरासरी किंमती रु. ४१८७/ रूपये प्रतिक्विंटल. होत्या.

यात मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजार ४१८७ रुपये, अकोला बाजारात ०४ हजार २५८ रुपये, अमरावती बाजारात ०४ हजार 309 रुपये, वाशिम बाजारात ४ हजार २६४ रुपये, तर लातूर बाजारात ०४ हजार ४४६ रुपये दर मिळाला होता.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/09/2024
कारंजा---क्विंटल200404045404040
तुळजापूर---क्विंटल40460046004600
मेहकरलोकलक्विंटल130400045754300
चिखलीपिवळाक्विंटल70400043504175
देउळगाव राजापिवळाक्विंटल3430043004300
निलंगापिवळाक्विंटल40440046004500
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डअकोला