Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर 

Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर 

Latest News Soyabean Market Inflows of old soybeans fall, prices improve read details  | Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर 

Soyabean Market : जुन्या सोयाबीनची आवक घटली, दरात समाधानकारक सुधारणा, वाचा सविस्तर 

Soyabean Market : गेल्या काही महिन्यांपासून 4200 रुपयांपर्यंत खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक आठवडाभरात सुधारणा झाली आहे.

Soyabean Market : गेल्या काही महिन्यांपासून 4200 रुपयांपर्यंत खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक आठवडाभरात सुधारणा झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून ४२०० रुपयांपर्यंत खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरात (Soyabean Market) अचानक आठवडाभरात सुधारणा झाली आहे. काही आठवडे ४२०० रुपयांचे दर आता ४५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरातच सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी वाढले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे यांनी दिली आहे. 

यंदाच्या हंगामातील सोयाबीन (Soyabean Bajarbhav) बाजारात दाखल होण्यास अद्याप १५ ते २० दिवसांचा आहे. अशात बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे. बाजार समित्यांत सोयाबीनची आवक घटत असल्याने दरात वाढ होत असली तरी हमीभावापेक्षा कमीच दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. २०२३- २४ या वर्षासाठी ४६०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला होता. मात्र, सध्यस्थितीत शेतकऱ्यांना हमीभावदेखील मिळत नाही. केंद्र शासनाने २०२४-२५ या वर्षासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपयांपर्यंतचा हमीभाव निश्चित केला आहे.

खाद्यतेलाच्या मागणीत वाढीचा परिणाम 
आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलाच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या तेलाचे दरही मागील काही दिवसांपासून काहीसे वाढत आहेत. याचा परिणाम बाजारावर होत असून, मागणीच्या तुलनेत २ सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने सोयाबीनच्या दरात आता वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापुढेही सोयाबीनच्या दरात सुधार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी आहे. जी आवक सुरु आहे, ती देखील गेल्या हंगामातील सोयाबीनची आहे. गेल्या आठवडाभरात सोयाबीनची मागणी वाढत जात आहे. त्यामुळे आठवडाभरातच सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी वाढून ४५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. दरम्यान, नवीन सोयाबीनची आवकला अजून १५ दिवसांचा वेळ लागेल. 
- प्रमोद काळे, सचिव, बाजार समिती, जळगाव

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/09/2024
कारंजा---क्विंटल2000419046904470
तुळजापूर---क्विंटल50455045504550
अमरावतीलोकलक्विंटल2112445045504500
सांगलीलोकलक्विंटल13490052005050
हिंगोलीलोकलक्विंटल413433147004515
मेहकरलोकलक्विंटल1070410046254500
ताडकळसनं. १क्विंटल135440046004500
यवतमाळपिवळाक्विंटल215420546504427
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150435045504400
भोकरपिवळाक्विंटल13435043504350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल65450045504525
दिग्रसपिवळाक्विंटल5410042054190
सावनेरपिवळाक्विंटल2429942994299
परतूरपिवळाक्विंटल26440046504500
देउळगाव राजापिवळाक्विंटल13400045554400
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100458046004590
बुलढाणापिवळाक्विंटल160400044254200
आष्टी-जालनापिवळाक्विंटल65400045904200
सोनपेठपिवळाक्विंटल78425045004400

Web Title: Latest News Soyabean Market Inflows of old soybeans fall, prices improve read details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.