Soyabean Market : सद्यस्थितीत सोयाबीनची (Soyabean) आवक घटली असून बाजारभावात देखील फारशी सुधारणा नसल्याचे चित्र आहे. जवळपास मागील आठवड्याचा विचार केला तर किंमतीत 1 टक्क्यांची घट झाली आहे. तर सरासरी किंमती ४१४१ रुपये इतक्या होत्या.
मागील आठवड्यात अकोला बाजारात (Akola Soyabean Market) सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४१४१ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत १ टक्के घट झाली आहे. म्हणजेच सध्याच्या सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबींनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर १५ टक्केनी घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे.
मागील बाजारपैकी आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४३४२/क्वि.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती ४१२६ रूपये क्विंटल होत्या. मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदूर बाजारात ४२०७ रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजारात ४१४१ रुपये, अमरावती बाजारात ४१२६ रुपये, वाशीम बाजारात ४१५० रुपये, लातूर बाजारात ४३४२ रुपये इतका दर मिळाला आहे.