Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण? 

Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण? 

Latest News Soyabean Market Reduced import duty on edible oil and rising imports make soybean prices down | Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण? 

Soyabean Market : साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली, जाणून घ्या नेमकं कारण? 

Soyabean Market : खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे साेयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे.

Soyabean Market : खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे साेयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे
नागपूर :
या वर्षी महाराष्ट्रासह देशात साेयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. साेयाबीनची (Soyabean Market) सरासरी उत्पादकता विचारात घेता उत्पादन वाढणार आहे. शेतकऱ्यांकडील साेयाबीन बाजारात यायला दाेन महिने शिल्लक असताना साेयाबीनचे दर ‘एमएसपी’पेक्षा ७०० ते १ हजार रुपयांनी खाली आले आहेत. खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे साेयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी देशात साेयाबीनचे पेरणीक्षेत्र १.२६ लाख हेक्टरने तर महाराष्ट्रात १.८० लाख हेक्टरने वाढले आहे. जागतिक साेयाबीन उत्पादनात भारताचा वाटा केवळ ३ टक्के असून, सरासरी उत्पादकता सर्वांत कमी म्हणजे प्रतिहेक्टरी १० क्विंटल आहे. सन २०२३-२४ च्या संपूर्ण विपणन हंगामात साेयाबीनचे दर ‘एमएसपी’च्या म्हणजेच प्रतिक्विंटल ४,६०० रुपयांच्या खाली राहिले. त्यामुळे अनेकांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साेयाबीन आजवर विकले नाही.


या वर्षीची एमएसपी प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये असली तरी साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल ३,८०० ते ४,२०० रुपयांच्या दरम्यान आहेत. साेयाबीनचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ४५ हजार रुपयांवर पाेहाेचला आहे. हा खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच उपाययाेजना करायला तयार नाही. उलट, खाद्यतेलाची भरमसाट आयात करून भाव पाडत असल्याचा आराेप साेयाबीन उत्पादकांनी केला आहे.

आयात शुल्कात कपात
केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावर सेससह ५.५ टक्के आणि शुद्ध खाद्यतेलांवर १३.७५ टक्के आयात शुल्क लावले आहे. हा निर्णय १४ जून २०२४ राेजी घेतला. रिफाइंड सोयाबीन व शुद्ध सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क १७.५० टक्क्यांवरून १२.५० टक्के केले. ऑक्टाेबर २०२१ मध्ये हे आयात शुल्क ३२.५० टक्के, त्यापूर्वी ४२ ते ४७ टक्के आणि सन २००४ ते २०१३ पर्यंत ७० ते ९० टक्के हाेते.

आयातीमुळे काेसळले दर
नाेव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या नऊ महिन्यांत १५ लाख १८ हजार ६७१ टन शुद्ध व १ काेटी ४ लाख १६ हजार ५५६ टन कच्च्या खाद्यतेलाची तसेच ६८ लाख ४५ हजार ९७ टन पामतेलाची आयात करण्यात आली. या वाढत्या आयातीमुळे मागील वर्षासह आगामी हंगामातील साेयाबीन व इतर तेलबियांचे दर काेसळले आहेत. तेलबियांच्या दरवाढीसाठी खाद्यतेलाची आयात कमी करणे, त्यावरील आयात शुल्क वाढविणे, खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.

Web Title: Latest News Soyabean Market Reduced import duty on edible oil and rising imports make soybean prices down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.