Soyabean Market : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या (Soyabean Market) किमती हमीभावापर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र मागील आठवड्यात पुन्हा दर घसरले. लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४६७० प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत जवळपास ०.६ टक्के घट झाली आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची (Soyabean Bajarbhav) आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सप्टेंबर महिन्यातील आवक पाहिली असता देशभरात पहिल्या आठवड्यांपासून आवकेत वाढ होत गेली आहे. त्याचबरोबर राज्यातही ४० टनांपर्यंत सोयाबीनची आवक झाल्याचं दिसून येत आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक आहेत.
मागील बाजारपैकी सोयाबीनच्या आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात सरासरी किंमती सर्वाधिक होत्या.४६७० रुपये प्रति क्विंटल) तर इंदोर (मध्यप्रदेश) बाजारात सरासरी किंमती रु.४२६० रुपये प्रति क्विंटलमागे होत्या. तर अकोला बाजारात ०४ हजार ४८५ रुपये, अमरावती बाजारात ०४ हजार ५०० रुपये, वाशिम बाजारात ०४ हजार ४४३ रुपये दर मिळाला.
संकलन : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे.
Soyabean Market : डिसेंबरमध्ये सोयाबीनचे दर कसे असतील? वाचा सविस्तर