Soyabean Market : मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात सोयाबीनच्या (Soyabean Market) बाजारभावात किंचितशी वाढ झाली आहे, मात्र एमएसपीपेक्षा दर कमीच असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात सोयाबीनला सरासरी ४६५३ रुपये दर मिळाला. त्यामुळे या आठवड्यात किमान आधारभूत किंमत मिळू शकेल काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत. मागील आठवड्यात काय दर मिळालेत पाहुयात...
सोयाबीन बाजारभावामुळे (Soyabean Price) शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवसांत नवे सोयाबीन बाजारात येण्यास सुरवात होईल. तर मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारभावात सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी लावून आहेत. मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी ४२१५ रुपये, अकोला बाजारात ४ हजार ४३७ रुपये अमरावती बाजारात ०४ हजार ५१० रुपये, वाशिम बाजार ४२२५ रुपये, लातूर बाजारात ४ हजार ६५३ रुपये दर मिळाला.
०४ ऑगस्ट रोजी सोयाबीनला सरासरी ०४ हजार ३०० रुपये, ११ ऑगस्ट रोजी सरासरी ०४ हजार ४०० रुपये, १८ ऑगस्ट रोजी ०४ हजार ४०० रुपये, २५ ऑगस्ट रोजी ०४ हजार ४०० रुपये, ०१ सप्टेंबर रोजी ४५०० रुपये आणि ०८ सप्टेंबरपर्यंत सरासरी ०८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. त्यामुळे मागील महिनाभरात सोयाबीनच्या दरात मोठा फरक झाल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी सोयाबीनच्या लातूर बाजारात सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४६५३ प्रति क्विंटल) तर इंदोर बाजारात सरासरी किंमती रु. ४११५ प्रति क्विंटल होत्या.
आवकमध्ये १७ टक्क्यांनी घट
मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४६५३ प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ४.७ टक्के वाढ झाली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर १७ टक्क्यांनी घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.