Join us

Soyabean Market : सोयाबीनची आवक 23 टक्क्यांनी वाढली, बाजारभाव कसा? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:34 PM

Soyabean Market : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयबीनच्या किंमतीत ३.६ टक्के घट झाली आहे. वाचा सविस्तर

Soyabean Market : सोयाबीनच्या दरात (Soyabean Market) सातत्याने घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत ४५०० प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ३.६ टक्के घट झाली आहे. तर आज देखील मार्केटला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाल्याचे बाजार अहवालावरून दिसून आले.

सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रति क्विंटल जाहीर (Soyabean MSP Price) करण्यात आलेली आहे. मात्र त्याच्या आधीपासून दरात घसरण सुरू आहे.  सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. आणि इतरही बाजार समित्यांमध्ये हेच चित्र आहे. 

एकीकडे शेतकरी सोयाबीन काढणीला सुरुवात करत आहेत. काही ठिकाणी नव्या सोयाबीनची सुद्धा आवक होताना दिसून येत आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर २३ टक्केनी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात साधारण २२ सप्टेंबर नंतर ही आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. 

मागच्या आठवड्यातील दर 

मागील बाजारपैकी आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक होत्या. तर वाशीम बाजारात सरासरी किंमती ४३६१ रुपये प्रति क्विंटल होत्या. यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात प्रतिक्विंटल मागे ०४ हजार ३८७ रुपये, अकोला बाजारात ०४ हजार ४४५ रुपये, अमरावती बाजारात ०४ हजार ५०० रुपये, वाशिम बाजारात ०४ हजार ३६१ रुपये दर मिळाला.

 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डलातूर