Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर?

Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर?

Latest News Soyabean Market Soybean price is lower than msp price for ten months see details | Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर?

Soyabean Market : दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव हमीदरापेक्षा कमी, आज काय मिळतोय दर?

Soyabean Market : सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. 

Soyabean Market : सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

यवतमाळ : मागील दहा महिन्यांपासून सोयाबीनचे (Soyabean Market) भाव स्थिरावले आहेत. हमीभावापेक्षाही ७०० ते ८०० रुपयांनी सोयाबीनचे भाव कमी आहेत. एक ते दीड महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. शासनाकडून २०२४-२५ या खरीप हंगामाकरिता चार हजार ८९२ रुपये सोयाबीनचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. येथील बाजार समितीमध्ये ७ ऑगस्ट रोजी चार हजार ते चार हजार २५५ रुपयांदरम्यान भाव मिळाला असून, आवक दोन हजार ४७ क्विंटल झाली आहे. हमीभावापेक्षाही (MSP Rate) कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. 

मागील हंगामात सोयाबीन (Soyabean Bajarbhav) हाती आल्यानंतर थोडे दिवस पाच हजारच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला होता. त्यानंतर आता जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी भावामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मागील दोन-तीन दशकांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले असून, सोयाबीनवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

आज ना उद्या भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनवर तारण कर्ज घेतले आहे. तारण कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार ३०० दरम्यानच असल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

तसेच नवीन सोयाबीन एक ते दीड महिन्यात घरात येणार असल्यामुळे आता मात्र शेतकरी सोयाबीन भाववाढीची आशा सोडून त्याची विक्री करत आहेत. सोयाबीनला भाव कमी व वजनही घटल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. भाववाढ होत नसल्यामुळे नाईलाजाने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री शेतकरी करत आहेत. परिणामी वणी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याचे दिसून येत आहे, सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ रुपये असला, तरी हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये कमी दराने सोयाबीन विकले जात आहे. एक ते दीड महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध तीव्र असंतोष
शासनाने २०२४-२५ या खरीप हंगामाकरिता सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ रुपये जाहीर केला असला, तरी हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी सोयाबीनची विक्री होत आहे. सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारितही भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. किमान हमीभाव तरी मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आज काय भाव मिळाला? 

आज अकोला बाजारात क्विंटलमागे पिवळ्या सोयाबीनला 04 हजार 140 रुपये, अमरावती बाजारात लोकल सोयाबीनला 4 हजार 138 रुपये, बीड बाजारात पिवळ्या सोयाबीनला 4 हजार 249 रुपये, बुलढाणा बाजारात 04 हजार 164 रुपये, लातूर बाजारात 04 हजार 352 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 75 रुपये, परभणी बाजारात 04 हजार 275 रुपये, यवतमाळ बाजारात 4 हजार 101 रुपये दर मिळाला

Web Title: Latest News Soyabean Market Soybean price is lower than msp price for ten months see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.