Soyabean Market : मागील आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनची (Soyabean) सरासरी किंमत रु. 4078 रुपये प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत 2 टक्के घट झाली आहे. मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात 04 हजार 199 रुपये, अकोला बाजारात 4 हजार 78 रुपये, अमरावती बाजारात 04 हजार 122 रुपये, वाशिम बाजारात 04 हजार 125 रुपये, तर लातूर बाजारात 04 हजार 333 रुपये दर मिळाला. एकूणच सध्या सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबींनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर 31 टक्के इतकी घट झाली आहे. ऍग्रीमार्कनेटच्या अहवालानुसार जून महिन्यात देशातील आवक 90 टनांपर्यंत होती तर महाराष्ट्रातील आवक ही 30 ते 35 टन एवढी होती. त्यानंतर जुलै महिन्यात सोयाबीनचे अवकेत घट होऊन ही आवक 30 टनाच्या खाली आली. तर मागील आठवड्यात आवक जवळपास 20 टनापर्यंत येऊन ठेपली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत रु.4892 प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील बाजारपैकी सोयाबीनच्या आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.4333/निव.) तर अकोला बाजारात सरासरी किंमती रु. 4078 रुपये प्रती क्विंटल होत्या.
आजचे सोयाबीनचे बाजारभावआज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 9 हजार 395 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 3 हजार 726 रुपयांपासून 04 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज पिवळ्या सोयाबीनला बीड बाजारात 04 हजार 126 रुपये, जिंतूर बाजारात चार हजार 75 रुपये परतुर बाजारात 3726 रुपये दर्यापूर आणि देऊळगाव राजा बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला.