Soyabean Market : आज 15 सप्टेंबर 2024 रोजी सोयाबीनची (Soyabean) राज्यातील तीन जिल्ह्यात 74 क्विंटलची आवक झाली. तर अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक झाली. या सोयाबीनला क्विंटल मागे सरासरी पाच हजार 251 रुपयांचा दर मिळाला.
आज अमरावती बाजारात (Amravati) पिवळ्या सोयाबीनची 06 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 04 हजार 200 रुपये तर सरासरी 04 हजार 300 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारात सर्वसाधारण सोयाबीनला कमीत कमी 04 हजार 600 रुपये तर सरासरी 4 हजार 650 रुपये दर मिळाला. आणि लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी 04 हजार 680 रुपये दर मिळाला.
काही ठिकाणी नवे सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. यामुळे आज अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी प्रवीण अशोकराव धारपवार या शेतकऱ्याच्या सोयाबीनला क्विंटल मागे 5251 रुपयांचा दर मिळाला. हा मुहूर्त दर असल्याचं सांगण्यात येत आहे.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
15/09/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 44 | 4600 | 4700 | 4650 |
अजनगाव सुर्जी | पिवळा | क्विंटल | 6 | 4200 | 4400 | 4300 |
देवणी | पिवळा | क्विंटल | 24 | 4600 | 4760 | 4680 |