Sugar Market : ऊसापासून साखर (Sugar Market) आणि गुळाची निर्मिती होत असते. आजच्या घडीला या तीनही घटकांचा बाजारभाव पाहिला असता साखरेला सर्वाधिक मार्केट असल्याचे दिसून येते. मात्र गुळाला देखील चांगला बाजारभाव असून आजच्या अहवालानुसार गुळाला क्विंटलमागे 3963 रुपये दर मिळाला. तर साखरेला 4175 रुपये आणि ऊसाला केवळ 600 रुपये दर मिळाला.
आज 07 सप्टेंबर रोजीच्या बाजार अहवालानुसार पुणे बाजारात (Pune Market) नंबर एकच्या गुळाची 295 क्विंटलची आवक झाली. तर या गुळाला 3963 रुपये दर मिळाला. तर नंबर दोनच्या गुळाची 183 क्विंटलची आवक झाली. या गुळाला 3863 रुपये दर मिळाला. तर काल साखरेची 3747 क्विंटलची आवक झाली, तर 4175 रुपये दर मिळाला. तर ऊसाला अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 442 क्विंटल आवक होऊन 600 रुपये दर मिळाला.
गुळाचा कालचा बाजार भाव पाहिला असता सांगली बाजारात क्विंटलमागे 3608 रुपये, मुंबई बाजार 4 हजार 900 रुपये, पुणे बाजारात नंबर 01च्या गुळाला 04 हजार 20 रुपये, बारामती बाजारात नंबर 02 च्या गोळ्याला 04 हजार 275 रुपये, पुणे बाजारात नंबर 2 च्या गुळाला 3873 रुपये तर जालना बाजारात पिवळ्या गुळाला 3625 रुपये दर मिळाला. तर साखरेला साधारण 04 हजार 175 रुपये दर मिळतो आहे.