Lokmat Agro >बाजारहाट > Today Kanda Bajarbhav : निर्यात अट शिथिलतेनंतर लासलगाव मार्केटमधील कांदा बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Today Kanda Bajarbhav : निर्यात अट शिथिलतेनंतर लासलगाव मार्केटमधील कांदा बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Latest news Today Kanda Bajarbhav Onion market price in Lasalgaon market after relaxation of export conditions, know in detail  | Today Kanda Bajarbhav : निर्यात अट शिथिलतेनंतर लासलगाव मार्केटमधील कांदा बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Today Kanda Bajarbhav : निर्यात अट शिथिलतेनंतर लासलगाव मार्केटमधील कांदा बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav :

Kanda Bajarbhav :

शेअर :

Join us
Join usNext

 Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सरासरी ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. अशा स्थितीत केंद्राने कांदा निर्यात मूल्य हटवले आणि निर्यात शुल्क घटवले. त्यामुळे आज सकाळी बाजार समित्यांमध्ये कांदाबाजारभाव वधारले असून सरासरी ५ हजार रुपयांपर्यंत क्विंटलमागे दर मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण बाजारात तब्बल ६० रुपये किलोपर्यंत दर मिळाला. 

केंद्र शासनाने कांदा किमान निर्यात मूल्य ५५० डॉलरवरून थेट शून्यावर आणि निर्यात शुल्क ४० ऐवजी २० टक्के केले. यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात कांदा दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर झाले आहेत. यापूर्वी म्हणजेच १५ ते २० दिवसांपासून कांद्याला ३८ रुपयापासून ते ४४ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. अशा स्थितीत सरकारच्या निर्णयामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. आज सकाळच्या बाजार अहवालानुसार हा दर ५० रुपयांपर्यंत पोहचला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने हा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचे शेतकर्यांकडून बोललं जात आहे., 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाच पाच सहा सहा ट्रॅक्टर कांदा शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत आता केंद्र सरकारने निर्यात मूल्याची अट हटवली, निर्यात शुल्क कमी केले. त्यामुळे कांदा बाजारभावात सुधारणा होऊन थेट ५० रुपये किलो दर झाला आहे. याआधीच ३८०० रुपयापासून ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. त्यात आता पाचशे ते सहाशे वाढ रुपयांची रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभावात बदल झाल्याचे दिसून येत आहे. तर काही निवडक बाजारात थेट ५५ ते ६० रुपये भाव मिळत असल्याचे समोर आले आहे. 

कळवण बाजारातील आज सकाळचे दर 

कळवण बाजारात ६० रुपये दर 
सरकारच्या निर्णयानंतर कांदा बाजारभावात वाढ झाली आहे. जवळपास ५ ते ६रुपयांनी दरात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज ४५०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. लासलगाव बाजारात ४६०० रुपये दर मिळाला आहे. तर कळवण बाजारात थेट ६ हजार रुपये दर मिळाला आहे. ही दर दुपारी २ वाजेपर्यंत मिळाला आहे. 

सरकारच्या निर्णयामुळे भाव वाढले आहेत, मात्र शेतकऱ्यांकडे खूपच कमी कांदा शिल्लक राहिला आहे. व्यापारी वर्ग कांदा खरेदीकडे लक्ष देऊन आहे. निर्यात खुली झाली आहे, मात्र हवा तसा माल मिळणे मुश्किल होणार असल्याचे चित्र आहे. कारण बाजारात आवक कमीच होत आहे. या निर्णयामुळे नाफेडचे फावणार असल्याचे दिसते. नाफेड आपला कांदा बाजारात आणू शकते. 
- राहुल गांगुर्डे, पिंपळगाव बसवंत 
 

Web Title: Latest news Today Kanda Bajarbhav Onion market price in Lasalgaon market after relaxation of export conditions, know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.