आज रविवारच्या दिवशी राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे लिलाव प्रक्रिया देखील निवडक बाजार समित्यांमध्ये पार पडली. त्यानुसार आज तुरीला सरासरी 9 हजार रुपये बाजारभाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 4 हजार 200 रुपये बाजारभाव मिळाला. तर ज्वारीला सरासरी 2500 रुपये बाजारभाव मिळाला.
तुरीचा बाजारभाव
आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार तीन बाजार समित्यामध्ये तुरीची 87 क्विंटल आवक झाली. यात सिल्लड, औसा, शेवगाव बाजार समितीचा समावेश असून औसा बाजार समितीत लाल तुरीची 61 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 8599 रुपये तर सरासरी 10 हजार 021 रुपयांचा बाजारभाव मिळाला. शेवगाव बाजार समितीत पांढऱ्या तुरीची 20 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 9 हजार रुपये तर सरासरी 9300 रुपये बाजारभाव मिळाला. सिल्लोड बाजार समितीत 6 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 7 हजार 900 रुपये तर सरासरी 8200 बाजारभाव मिळाला.
सोयाबीनचा बाजारभाव
आज सोयाबीनची सिल्लड, औसा या दोन बाजार समितीत 1176 क्विंटल इतकी आवक झाली. सिल्लोड बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 4300 रुपये तर सरासरी देखील 4300 रुपये बाजारभाव मिळाला. तर औसा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 1171 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 4451 रुपये तर सरासरी 4527 रुपये बाजारभाव मिळाला.
ज्वारीचा बाजारभाव
आज ज्वारीची शेवगाव आणि औसा बाजार समितीमध्ये हायब्रीड, पांढरी, पिवळ्या ज्वारीची आवक झाली. या दोन बाजार समित्या मिळून 88 क्विंटल ज्वारीची आवक झाली. शेवगाव बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 50 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2800 रुपये आणि सरासरी देखील 2800 रुपये बाजारभाव मिळाला. औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला कमीत कमी 2451 रुपये तर सरासरी 2618 रुपये बाजारभाव मिळाला. याच बाजार समितीत पिवळ्या ज्वारीला कमीत कमी 3300 रुपये तर सरासरी 3611 रुपये बाजारभाव मिळाला. हाच ज्वारीचा आजच्या दिवसातील सर्वाधिक भाव होता.