Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याच्या दरात चढ-उतार कायम, आज काय बाजारभाव मिळाला?

कांद्याच्या दरात चढ-उतार कायम, आज काय बाजारभाव मिळाला?

Latest News today onion rate in nashik and all over maharashtra see details | कांद्याच्या दरात चढ-उतार कायम, आज काय बाजारभाव मिळाला?

कांद्याच्या दरात चढ-उतार कायम, आज काय बाजारभाव मिळाला?

आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळाला.

आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दरात चांगलाच चढ उतार पाहायला मिळत आहे. विशेषतः कांद्याच्या आवकेत देखील मोठ्या वाढ झाल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे. अशातच राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या आजच्या अहवालानुसार लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांद्याची 17 हजार 250 इतकी आवक झाली. तर सरासरी या कांद्याला 1875 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे कालच्यापेक्षा आज 50 रुपयांनी भाव घसरल्याचे दिसून आले. 

कांद्याच्या दरात सुरु असलेल्या चढ उतारामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. अशातच देशभरात कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. एकट्या सोलापूरच्या बाजार समिती 80 ऐंशी हजाराहून अधिक क्विंटल कांदा दाखल झाला. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याची मोठी आवक झाली. त्यानुसार आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची 20 हजार 055    क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव 900 रुपये असा होता. तर सरासरी भाव 1900 रुपये असा मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याची आज 12 हजार 600    हजार क्विंटल आवक  झाली. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये इतका मिळाला. मनमाड बाजार समितीत येथे लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजे 410 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी बाजारभाव मिळाला. विशेष म्हणजे कालच्या पेक्षा आज बाजारभाव दोनशे रुपयांनी वधारल्याचे या बाजार समितीत पाहायला मिळाले. 

 राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

 
अकलुज---क्विंटल34050022001500
कोल्हापूर---क्विंटल922750020001400
अकोला---क्विंटल960140022002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13771001800950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल433200030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9735160024002000
खेड-चाकण---क्विंटल5000100021001500
मंचर- वणी---क्विंटल125140017501600
सातारा---क्विंटल109100021001550
हिंगणा---क्विंटल2190019001900
बारामतीलालक्विंटल44650029301700
येवलालालक्विंटल1500050019391800
येवला -आंदरसूललालक्विंटल1300060019001775
लासलगावलालक्विंटल9350100020991900
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1725080020001875
जळगावलालक्विंटल269757518751082
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500070019551800
सिन्नर - नायगावलालक्विंटल66550019001850
संगमनेरलालक्विंटल610120023001250
चांदवडलालक्विंटल1100090020591880
मनमाडलालक्विंटल450041020561850
सटाणालालक्विंटल533030019551540
कोपरगावलालक्विंटल476050020011875
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल413550019021725
पेनलालक्विंटल225320034003200
पारनेरलालक्विंटल1524430025001575
साक्रीलालक्विंटल1625117020001550
भुसावळलालक्विंटल2770015001000
देवळालालक्विंटल614030520301850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल70850020001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1289130020001150
पुणेलोकलक्विंटल657970022001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140016001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700120019001750
वडगाव पेठलोकलक्विंटल30120020001500
मंगळवेढालोकलक्विंटल102030019001400
कामठीलोकलक्विंटल14150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1260050021511850
नाशिकउन्हाळीक्विंटल350545020511675
सटाणाउन्हाळीक्विंटल83030022301655
कोपरगावउन्हाळीक्विंटल605001015900
 

Web Title: Latest News today onion rate in nashik and all over maharashtra see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.