आज रविवार असल्याने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद होती. त्यामुळे निवडक बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक झाली. आज गव्हाची केवळ दोन बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून एकूण 534 क्विंटल आवक झाली. यात 2189 या वाणाचा समावेश होता. तर काल रंगपंचमीच्या दिवशी पावणे चार हाहजार क्विंटल गव्हाची आवक झाली होती.
आज 31 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेवगाव, दौंड या बाजार समित्यामध्ये गव्हाची आवक झाली. यात शेवगाव बाजार समितीमध्ये 170 क्विंटल 2189 गव्हाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2300 रुपये तर सरासरी 2650 रुपये दर मिळाला. तर दौंड बाजार समितीत 364 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2200 रुपये तर सरासरी 2700 रुपये क्विंटलमागे दर मिळाला.
तर काल 2189 या वाणाला शेवगाव - भोदेगाव बाजार समितीत सरासरी 2600 दर मिळाला होता. तर भंडारा बाजार समितीत याच वाणाला सरासरी 2400 रुपये दर मिळाला. म्हणजेच जवळपास दोनशे रुपयांचा फरक असल्याचे दिसून आले.
पाहुयात आजचे गव्हाचे दर
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
31/03/2024 | ||||||
अहमदनगर | २१८९ | क्विंटल | 170 | 2300 | 2650 | 2650 |
पुणे | २१८९ | क्विंटल | 364 | 2200 | 3000 | 2700 |