आज पीएम नाशिक जिल्ह्यात येत असून पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सभेत कांदा प्रश्नावर बोलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी आज सकाळ सत्रात कांद्याला सरासरी 1250 रुपयापासून ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत कांद्याची 29 हजार क्विंटलची आवक झाली.
आज नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची 26 हजार क्विंटलची आवक झाली. आज येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 7000 क्विंटल आवक झाली तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला. येवला -आंदरसूल बाजार समितीत 1361 रुपये दर मिळाला. तर लासलगाव - विंचूर बाजार समितीत 10 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1700 रुपये दर मिळाला. चांदवड बाजार समितीत सरासरी 1470 रुपये दर मिळाला.
तर इतर बाजार समित्यांमध्ये सांगली -फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी 1250 रुपये, पुणे -पिंपरी बाजार समितीमध्ये 1700 रुपये, वाई बाजार समितीमध्ये 1500 रुपये आणि कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा दर मिळाला.
असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
15/05/2024 | ||||||
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 2887 | 600 | 1900 | 1250 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 19 | 1600 | 1800 | 1700 |
वाई | लोकल | क्विंटल | 15 | 1000 | 2000 | 1500 |
कामठी | लोकल | क्विंटल | 4 | 1500 | 2500 | 2000 |
येवला | उन्हाळी | क्विंटल | 7000 | 225 | 1770 | 1500 |
येवला -आंदरसूल | उन्हाळी | क्विंटल | 500 | 200 | 1570 | 1361 |
लासलगाव - विंचूर | उन्हाळी | क्विंटल | 10500 | 700 | 2000 | 1700 |
चांदवड | उन्हाळी | क्विंटल | 8200 | 700 | 1981 | 1470 |