Join us

PM In Nashik : आज पीएम नाशिकमध्ये, सकाळी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:55 PM

आज पीएम नाशिक जिल्ह्यात येत असून पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

आज पीएम नाशिक जिल्ह्यात येत असून पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सभेत कांदा प्रश्नावर बोलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी आज सकाळ सत्रात कांद्याला सरासरी 1250 रुपयापासून ते  1700 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत कांद्याची 29 हजार क्विंटलची आवक झाली. 

आज नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची 26 हजार क्विंटलची आवक झाली. आज येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 7000 क्विंटल आवक झाली तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला. येवला -आंदरसूल बाजार समितीत 1361 रुपये दर मिळाला. तर लासलगाव - विंचूर बाजार समितीत 10 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1700 रुपये दर मिळाला. चांदवड    बाजार समितीत सरासरी 1470 रुपये दर मिळाला. 

तर इतर बाजार समित्यांमध्ये सांगली -फळे भाजीपाला    मार्केटमध्ये सरासरी 1250 रुपये, पुणे -पिंपरी बाजार समितीमध्ये 1700 रुपये, वाई बाजार समितीमध्ये 1500 रुपये आणि कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/05/2024
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल288760019001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19160018001700
वाईलोकलक्विंटल15100020001500
कामठीलोकलक्विंटल4150025002000
येवलाउन्हाळीक्विंटल700022517701500
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50020015701361
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1050070020001700
चांदवडउन्हाळीक्विंटल820070019811470
टॅग्स :नाशिकमार्केट यार्डनरेंद्र मोदीकांदा