Join us

Onion Bajarbhav : धाराशिव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 7:00 PM

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 16 हजार 799 क्विंटलची आवक झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 16 हजार 799 क्विंटलची आवक झाली. रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्येच आवक झाल्याचे दिसून आले. आज कांद्याला (Onion Rate) सरासरी 1400 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 02 जून 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला दौंड केडगाव बाजार समिती 02 हजार रुपये, सातारा बाजार समितीत (Satara Market Yard) 2250 रुपये तर राहता बाजार समिती 1900 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर लाल कांद्याला धाराशिव बाजार समिती 1675 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 1600 रुपये दर मिळाला.

पुणे खडकी बाजारात लोकल कांद्याला 1500 रुपये, पुणे पिंपरी बाजार समितीत 1800 रुपये तर मोशी बाजार समितीत 1300 रुपयांचा दर मिळाला. तर आज कोपरगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 3 हजार 968 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1890 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/06/2024
दौंड-केडगाव---क्विंटल173770026002000
सातारा---क्विंटल175200025002250
राहता---क्विंटल374440026001900
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6513100027101400
धाराशिवलालक्विंटल4285025001675
भुसावळलालक्विंटल15140018001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल27120016001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17140022001800
पुणे-मोशीलोकलक्विंटल54160020001300
वाईलोकलक्विंटल20100025001800
कोपरगावउन्हाळीक्विंटल3968100021801890
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र