Join us

होळीला लाल-पांढऱ्या तुरीची आवक, सरासरी भाव काय मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:01 PM

आज होळीच्या दिवशी दुपारी सहा वाजेपर्यंत चार बाजार समित्यांमध्ये दीडशे क्विंटल तुरीची आवक झाली.

आज होळी आणि रविवार असल्याने निवडक बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली. दुपारी सहा वाजेपर्यंत चार बाजार समित्यांमध्ये दीडशे क्विंटल तुरीची आवक झाली. यात तुरीला सरासरी 9200 रुपये दर मिळाला. यात लाल आणि पांढऱ्या तुरीचा समावेश आहे. 

आज 24 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील अजनगाव सुर्जी, वरोरा, वरोरा-खांबाडा, शेवगाव आदि बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली. यात अजनगाव सुर्जी बाजार समितीत 110 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. या लाल तुरीला सरासरी 9700 रुपये दर मिळाला. वरोरा बाजार समितीत 4 क्विंटल तुरीची आवक झाली. तर सरासरी 8900 रुपये दर मिळाला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-खांबाडा बाजार समितीत 12 क्विंटल लाल तर दाखल झाली होती. या तुरीला सरासरी 8900 रुपये दर मिळाला. तर शेवगाव बाजार समितीत 25 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली. या तुरीला सरासरी 9300 रुपये दर मिळाला. काल पांढऱ्या तुरीला सरासरी 9 हजार रुपये दर मिळाला होता. विशेष म्हणजे एका बाजार समितीत 10 हजार रुपयांचा टप्पाही ओलांडला होता. 

असे आहेत आजचे तुरीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/03/2024
अजनगाव सुर्जीलालक्विंटल1109000101509700
वरोरालालक्विंटल4850093008900
वरोरा-खांबाडालालक्विंटल12850091008900
शेवगावपांढराक्विंटल25930093009300
23/03/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल3840094028499
राहूरी -वांबोरी---क्विंटल1830183018301
पैठण---क्विंटल3850091509000
उदगीर---क्विंटल1031100001063610318
वैजापूर---क्विंटल12700092059000
देवणी---क्विंटल89595100909842
मुरुमगज्जरक्विंटल1809500101669833
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1920092009200
सोलापूरलालक्विंटल3880097108800
अकोलालालक्विंटल16058505105609700
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदासोलापूरतुरा