मागील दोन दिवसांच्या बाजार समिती बंदनंतर आज सर्वच शेतमालाचे लिलाव पार पडले. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये द्राक्षांची अडीच हजार क्विंटलहून अधिक आवक झाली. तर प्रति क्विंटलला सरासरी 3500 च्या आसपास बाजारभाव मिळाला. तर केळीची केवळ चार ते पाच बाजार समित्यामध्ये आवक झाल्याचे पाहायला मिळाले.
आज 27 फेब्रुवारी 2024 च्या पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आंब्याची आवक सुरू झाली असून असून सोलापूर बाजार समितीत हापूस आंब्याचे 39 क्विंटल आवक झाली. हापूस आंब्याला प्रती क्विंटलला सर्वाधिक बाजारभाव सांगली -फळे भाजीपाला मार्केटमध्ये मिळाला. तर डाळिंबाच्या लोकल, मृदुला, गणेश, आरक्ता या जातींची आवक बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली. यात सर्वाधिक बाजारभाव पूजेनं बाजार समितीत आरक्ता या वाणाला मिळाला. प्रति क्विंटल सरासरी 10700 इतका भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत भुसावली केळीची 435 क्विंटल आवक झाली. या केळीला सरासरी 1400 रुपये बाजारभाव मिळाला.
आजच्या बाजार अहवालानुसार मोसंबीची प्रमुख बाजार समित्यांमध्ये जवळपास 1400 क्विंटलची आवक झाली. पुणे बाजार समितीत सरासरी सर्वाधिक 4 हजार 400 रुपये बाजार मिळाला. तर सर्वात कमी भाव हा नंबर एकच्या वाणाला नागपूर बाजार समितीत मिळाला. पपईची आवक देखील कमी झाल्याचे दिसून आले. आज प्रति क्विंटलला सरासरी 1000 रुपये बाजार मिळाला. नागपूर बाजार समितीत नंबर 01, नंबर 02, नंबर 03 संत्री वाणाला इतर वाणांच्या तुलनेत कमी भाव मिळाला. अनुक्रमे सरासरी 2450 रुपये, 1725 रुपये आणि 1150 रुपये असं बाजारभाव मिळाला.
असे आहेत राज्यातील द्राक्ष बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/02/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 105 | 3000 | 8000 | 5500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 1119 | 5000 | 7000 | 6000 |
सोलापूर | लोकल | नग | 3201 | 40 | 180 | 110 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 60 | 2500 | 4000 | 3250 |
पुणे | लोकल | क्विंटल | 1050 | 2000 | 12000 | 7000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 124 | 3500 | 4000 | 3750 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | नाशिक | क्विंटल | 133 | 2000 | 4000 | 3000 |
जळगाव | नाशिक | क्विंटल | 23 | 2000 | 3500 | 2500 |