Join us

भुसावळी केळीला आज काय भाव मिळाला? वाचा आजचे फळ बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 6:13 PM

राज्यातील बाजार समित्यामध्ये फळांना काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊया..

आज 14 फेब्रुवारी फळ बाजार अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत हापूस आंब्याचे केवळ 17 नग प्राप्त झाले. या ठिकाणी कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 2000 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत डाळींबची 281 क्विंटल इतकी आवक झाली. या बाजार समितीत प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 9200 रुपये बाजार भाव मिळाला. याच बाजार समितीत द्राक्षास कमीत कमी 2000    तर सरासरी 7000 हजार रुपये बाजार भाव मिळाला. कलिंगडला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1200 रुपये भाव मिळाला. 

आज पुणे बाजार समितीत मोसंबीस कमीत कमी 2500 रुपये ते सरासरी 4200 रुपये बाजार भाव मिळाला. पपईस कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1100रुपये बाजार भाव मिळाला. संत्रीस कमीत कमी दोन हजार 2500    रुपये तर सरासरी 4200 रुपये बाजार भाव मिळाला. स्ट्रॉबेरीस कमीत कमी 5000 रुपये तर सरासरी 6000 रुपये बाजार भाव मिळाला. सफरचंदास कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2200 बाजारभाव मिळाला. 

आजचे केळीचे बाजारभाव पाहिले असता नाशिक बाजार समितीत भुसावळी केळीची 240    क्विंटल आवक झाली. तर या ठिकाणी कमीत कमी 800 तर सरासरी 1400 रुपये बाजारभाव  मिळाला. नागपूर बाजार समितीत भुसावळी केळीची 100 क्विंटल आवक झाली. तर या ठिकाणी कमीत कमी 450    तर सरासरी 525 रुपये बाजारभाव  मिळाला. कल्याण बाजार समितीत क्रॉस ब्रीड केळीची अवघी 3 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 550 रुपये तर सरासरी 600 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजार समितीत केवळ 10 क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर 800 रुपये तर सरासरी दर 1000 रुपये मिळाला. एकूणच केळीचे भाव देखील घसरल्याने केली उत्पादक चिंतेत सापडला आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डफळे