Join us

द्राक्षांसह केळीचे भावही घसरले, जाणून घ्या आजचे सविस्तर फळांचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 5:23 PM

राज्यातील बाजार समित्यामध्ये आज कुठल्या फळाला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया..

आज 17 फेब्रुवारी फळ बाजार अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत हापूस आंब्याचे केवळ 16 नग प्राप्त झाले. या ठिकाणी कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 2200 रुपये बाजारभाव मिळाला. नागपूर बाजार समितीत डाळींबची 100 क्विंटल इतकी आवक झाली. या बाजार समितीत प्रतिक्विंटलला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 4000 रुपये बाजार भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत द्राक्षास कमीत कमी 2500 तर सरासरी 4500 हजार रुपये बाजार भाव मिळाला. कलिंगडला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1200 रुपये भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत केळीस कमीत कमी 450 रुपये ते सरासरी 525 रुपये बाजार भाव मिळाला. अकलूज बाजार समितीत मोसंबीस कमीत कमी 5000 रुपये तर सरासरी 5500 रुपये बाजार भाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत पपईस कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 800 रुपये बाजार भाव मिळाला. कोल्हापूर बाजार समितीत सफरचंद कमीत कमी 3000 रुपये तर सरासरी 4500 रुपये बाजार भाव मिळाला. जळगाव बाजार समितीत संत्रीस कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2000 बाजारभाव मिळाला.

आजचे चिकूचे बाजारभाव पाहिले असता सोलापूर बाजार समितीत कमीत कमी 500 तर सरासरी 1300 रुपये बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत पेरूची 164 क्विंटल आवक झाली. तर या ठिकाणी कमीत कमी 500 तर सरासरी 1500 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत टरबूजची अवघी 30 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 700 रुपये दर मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेतकरी