Ginger Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये आल्याची 527 क्विंटलची आवक झाली. यात हायब्रीड आणि लोकल आल्याची आवक झाली. अहमदनगर, धाराशिव, नागपूर, पुणे (Pune), सांगली, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये आवक झाली.
आजचा पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये आल्याची (ginger Market) आवक झाली. यात सर्वाधिक 492 क्विंटलची लोकल आल्याची आवक पुणे बाजारात (Pune Bajar) झाली. या बाजारात सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळाला. तर पुणे मोशी बाजारात 7500 रुपयांचा दर मिळाला. तर एकट्या रामटेक बाजार समितीत आलेल्या हायब्रीड आल्याला क्विंटलमागे सरासरी 09 हजार रुपयांचा दर मिळाला.
तर आज सर्वसाधारण आल्याला धाराशिव बाजार समितीमध्ये 7500 रुपये, मंचर बाजार समितीमध्ये 4200 रुपये, सातारा बाजार समिती 09 हजार रुपये, पलूस बाजार समिती 07 हजार 500 रुपये तर राहता बाजार समितीत सर्वाधिक 09 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. त्यानुसार आल्याला समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
असे आहेत आल्याचे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
09/06/2024 | ||||||
अहमदनगर | --- | क्विंटल | 3 | 7000 | 12000 | 9500 |
धाराशिव | --- | क्विंटल | 3 | 4000 | 11000 | 7500 |
नागपूर | हायब्रीड | क्विंटल | 6 | 8000 | 10000 | 9000 |
पुणे | --- | क्विंटल | 2 | 2000 | 6000 | 4200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 492 | 4500 | 10000 | 7250 |
सांगली | --- | क्विंटल | 2 | 7000 | 8000 | 7500 |
सातारा | --- | क्विंटल | 19 | 8000 | 10000 | 9000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 527 |