Lokmat Agro >बाजारहाट > द्राक्षांसह टोमॅटोचा बाजारभाव घसरला, आज कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाला? 

द्राक्षांसह टोमॅटोचा बाजारभाव घसरला, आज कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाला? 

Latest News Todays Grape and tomato market price in maharashtra bajar samiti | द्राक्षांसह टोमॅटोचा बाजारभाव घसरला, आज कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाला? 

द्राक्षांसह टोमॅटोचा बाजारभाव घसरला, आज कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये द्राक्ष आणि टोमॅटोला काय बाजारभाव हे जाणून घेऊयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये द्राक्ष आणि टोमॅटोला काय बाजारभाव हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

नाशिकसह राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये द्राक्षांसह टोमॅटोची आवक होत आहे. काही बाजार समित्यांमध्ये द्राक्षाला समाधानकारक तर काही बाजार समित्यांमध्ये अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. तेच टोमॅटोच्या बाबत घडत आहे. आजच्या दर अहवालानुसार द्राक्षाला प्रति क्विंटल सरासरी साडे तीन ते चार हजाराच्या आसपास बाजारभाव मिळाला आहे. तर टोमॅटोच्या बाजारभावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


असे आहेत द्राक्ष बाजारभाव 

आज 06 मार्चच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नऊ बाजार समित्यामध्ये केवळ 2 हजार 281 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. तर एका बाजार समितीत 4318 नग प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून द्राक्षांची आवक कमी होताना दिसते आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक 980 क्विंटलची    आवक ही मुंबई - फ्रुट मार्केटमध्ये झाली. तर नगांचा विचार केला तर सोलापूर बाजार समितीमध्ये 4318 नग प्राप्त झाले. तर प्रति नगाला सरासरी 80 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर सर्वात कमी म्हणजेच 20 क्विंटलची आवक नाशिक बाजार समितीत झाली. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 82 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 3850 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर सांगली -फळे भाजीपाला बाजार समितीत सर्वात कमी म्हणजेच 2000 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला. एकूणच मागील काही दिवसांच्या तुलनेत बाजारभाव घसरला असल्याचे दिसून आले. 

असे आहेत आजचे टोमॅटो बाजारभाव 

आज 22 बाजार समित्यामध्ये टोमॅटोच्या वैशाली, लोकल, हायब्रीड, नंबर 01 या वाणांची आवक झाली. मुंबई बाजार समितीमध्ये नंबर एक वाणाची सर्वाधिक 2149 क्विंटलची आवक झाली. त्यानंतर पुणे बाजार समितीत लोकल टोमॅटोची 1907 क्विंटलची आवक झाली. यानंतर भुसावळ, कामठी, कळमेश्वर, कल्याण, पुणे -पिंपरी, पंढरपूर आदी बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्याचे दिसून आले. आज नागपूर बाजार समितीत वैशाली टोमॅटो वाणाला सर्वाधिक क्विंटलमागे सरासरी 1875 रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यांनतर सर्वात कमी म्हणेजच अनुक्रमे प्रती क्विंटलला 700 पासून ते नऊशे रुपये बाजारभाव  सोलापूर, जळगाव, पंढरपूर, वाई, मंगळवेढा, कोल्हापूर या बाजार समितीत मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत टोमॅटोला 650 रुपये बाजारभाव मिळाला. याच बाजार समितीत तीन दिवसांपूर्वी 800 रुपये बाजारभाव मिळाला. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest News Todays Grape and tomato market price in maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.