आज रविवार असल्याने ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. यात सिल्लोड आणि शेवगाव बाजार समितीत ज्वारीची अनुक्रमे 2 आणि 6 क्विंटल आवक झाली. यात ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 2800 रुपये दर मिळाला.
आज 05 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सिल्लोड बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला कमीत कमी 2000 रुपये आणि सरासरी 2100 रुपये दर मिळाला.. तर शेवगाव बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला कमीत कमी 2000 रुपये तर सरासरी 2800 रुपये दर मिळाला. दरम्यान कालचा बाजारभाव पाहिला तर सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2110 रुपये ते 2500 रुपये दर मिळाला होता.
तर हायब्रीड ज्वारीची आवक वाढत असली तरी दर मात्र इतर ज्वारीच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. काल हायब्रीड ज्वारीला सरासरी 1500 रुपयापासून ते 3350 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला नागपूर बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.