Join us

Kanda Market : पुणे, भुसावळ, नाशिक बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 5:19 PM

Kanda Bajarabhav : आज 18 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 810 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) आवक झाली. जवळपास दहा बाजार समितीत मिळून 33 हजार 522 क्विंटल कांद्याची आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 2350 रुपयांपासून ते 3300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 18 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातून (Nashik Kanda Market) कांद्याची 810 क्विंटलची आवक झाली. तर अहमदनगर जिल्ह्यात 6819 क्विंटलचे आवक झाली. आज सर्वाधिक आवक ही पुणे बाजारात लोकल कांद्याची जवळपास 12495 क्विंटल झाली. आज अहमदनगर बाजारातून हा कांद्याला 2800 रुपये तर नाशिक जिल्ह्यात 3300 दर मिळाला. 

तर भुसावळ बाजारात लाल कांद्याला 2700 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला 2750 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 3200 रुपये, तर पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला 2800 रुपये, त लासलगाव- निफाड बाजारात 3300 रुपये दर मिळाला. तसेच सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात 2350 रुपये तर राहता बाजारात 3200 दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त 

दर

सर्वसाधारण

दर

18/08/2024
अहमदनगर---क्विंटल2380100037003200
अहमदनगरउन्हाळीक्विंटल6819150036002800
जळगावलालक्विंटल16250030002700
नाशिकउन्हाळीक्विंटल810150034003300
पुणे---क्विंटल2262220036003100
पुणेलोकलक्विंटल12495220036002900
पुणेचिंचवडक्विंटल8731150037102800
सातारा---क्विंटल9150032002350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)33522
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकपुणेकृषी योजना