सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये मका, गहू, हरभरा या पिकांच्या आवकेत वाढ होत आहे. आजच्या बाजार दर अहवालानुसार लोकल गव्हाला प्रतिक्विंटल मागे सरासरी साधारण 2200 रुपये बाजारभाव मिळाला आहे. पुणे बाजार समितीत हरभरा पिकाची 43 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत प्रती क्विंटलला कमीत कमी 6 हजार 600 तर सरासरी 7050 रुपये बाजार मिळाला.
आजचे गव्हाचे दर पाहुयात
आज 23 फेब्रूवारीच्या बाजार दर अहवालानुसार लासलगाव- निफाड बाजार समितीत 2189 या जातीच्या गव्हाची 53 क्विंटल आवक झाली. या गव्हाला कमीत कमी 2361 रुपये तर सरासरी 2700 रुपये बाजारभाव मिळाला. अकोला बाजार समितीत लोकल गव्हाची 186 क्विंटल आवक झाली. या गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 1900 रूपये तर सरासरी 2285 रुपये बाजार मिळाला. पैठण बाजार समितीत बन्सी गव्हाची 60 क्विंटल आवक झाली. या गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2401 रूपये तर सरासरी 2851 रुपये बाजार मिळाला. पुणे बाजार समितीत शरबती गव्हाची 421 क्विंटल आवक झाली. या गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 4800 रूपये तर सरासरी 5000 रुपये बाजार मिळाला. एकूणच शरबती गव्हाला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे बाजार समिती दर अहवालावरून दिसून येत आहे.
आजचे हरभरा बाजारभावयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने अनेक भागातील हरभरा आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात देखील हरभरा पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.आजच्या बाजार दर अहवालानुसार पुणे बाजार समितीत हरभरा पिकाची 43 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत प्रती क्विंटलला कमीत कमी 6 हजार 600 तर सरासरी 7050 रुपये बाजार मिळाला. जळगाव बाजार समितीत बोल्ड हरभरा पिकास प्रती क्विंटल सरासरी तब्बल 8 हजार 100 इतका बाजारभाव मिळाला. तर याच बाजार समितीत चाफा या हरभरा जातीस सरासरी 5 हजार 750 रुपये बाजार मिळाला. सोलापूर बाजार समितीत गरडा जातीच्या हरभरा पिकास कमीत कमी 5 हजार 820 रुपये तर सरासरी 5 हजार 870 रुपये इतका बाजारभाव मिळाला. कल्याण बाजार समितीत हायब्रीड हरभरा पिकास सरासरी 6 हजार 700 रुपये बाजार मिळाला. अकोला बाजार समितीत काबुली हरभरा पिकास कमीत कमी 10 हजार 150 तर सरासरी 11 हजार 750 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तर या खालोखाल जळगाव बाजार समितीत नंबर 1 हरभरा पिकासाठी प्रती क्विंटल सरासरी 8 हजार 855 रुपयांचा बाजारभाव मिळाला.
मका दराची काय स्थिती?
लासलगाव निफाड बाजार समितीत मका पिकास सरासरी 2225 रुपये बाजार मिळाला. अमरावती बाजार समितीत लाल मका पिकास कमीत कमी 2000 तर सरासरी 2100 रुपये इतका बाजारभाव मिळाला. तर या मुंबई बाजार समितीत लोकल मका पिकासाठी प्रती क्विंटल सरासरी 3150 रुपयांचा बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत पिवळी मका पिकास कमीत कमी 1975 रुपये तर सरासरी 2078 रुपये बाजारभाव मिळाला. त्यानुसार आज पैठण बाजार समितीत पिवळी मका पिकास सर्वात कमी भाव मिळाला.