Join us

Kothimbir Bajarbhav : कोथिंबीर जुडीला काय भाव मिळतोय? जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 3:24 PM

Kothimbir Rate : पावसामुळे काही प्रमाणात आवक घटल्याने सर्व पालेभाज्यांच्या भावात तेजी आली आहे.

Kothimbir Market : सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असल्याने पावसामुळे शेतातील उभे पीक काढण्यासाठी अडचण निर्माण झाली, त्यात काही प्रमाणात आवक घटल्याने सर्व पालेभाज्यांच्या भावात तेजी आली आहे. रविवारी दिंडोरी तालुक्यातील देवठाण येवून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरीला (Coriander Market) लिलावात शेकडा १७ हजार रुपये, म्हणजेच प्रतिजुडी १७० रुपयांचा बाजारभाव मिळाल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

सद्यस्थितीत भाजीपाल्याचे (Vegetables Market) दर वाढले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणवर पिकवला जातो. याच अनुषंगाने दिंडोरी (Dindori) तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी जनार्दन महाले यांनी २०० पेक्षा अधिक जुड्या कोथिंबीर माल विक्रीसाठी आणला होता. त्या मालाला प्रतिजुडी १७० रुपये असा यंदाच्या वर्षातील उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याचे व्यापारी नितीन लासुरे रे यांनी सांगितले. 

कोथिंबीरपाठोपाठ मेथीलादेखील मागणी असून, सायंकाळी लिलावात मेथीला ८० रुपये प्रतिजुडी असा दर मिळाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर आणखी वाढला तर बाजारभाव अधिक तेजीत येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी लाहुरे यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून कोथिंबीरचा भाव १०० रुपयांच्या पुढेच होता. मागील आठवड्यात १२० रुपये, त्यानंतर १७० रुपये भाव होता, परंतु रविवारी भावाने पुन्हा उसळी घेतली. 

काय दर मिळतोय? 

देवठाण येथील शेतकरी जनार्दन महाले म्हणाले की, शेतात दिवसरात्र राहून मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कोथिंबिरीला २७ हजार रुपये शेकडा इतका बाजारभाव मिळाल्याने समाधानी आहे. कोरिधीर मालाची आवक कमी प्रमाणात असल्याने समाधानकात भाव मिळाला आहे. तर आज कोल्हापूर बाजार समिती सर्वसाधारण कोथिंबीरीला क्विंटलमागे 07 हजार 500 रुपये, तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कोथंबीरीला क्विंटलमागे 10 हजार रुपये, कामठी बाजारात 9000 रुपये असा दर मिळाला. 

टॅग्स :मार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रनाशिक