Join us

kothmbir bajarbhav : कोथिंबिरीला क्विंटल आणि जुडी मागे काय भाव मिळतोय? आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 7:34 PM

kothmbir bajarbhav :

kothmbir bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कोथिंबीरीची (kothmbir bajarbhav) 807 क्विंटल ची तर दोन लाखाहून अधिक जुड्यांची आवक झाली. आज कोथिंबीरीला क्विंटल मागे सरासरी 04 हजारापासून ते 05 हजार 800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला तर जुडीला 15 रुपयांचा दर मिळाला. 

आज सर्वसाधारण कोथिंबीरीची (Coriander Market) चांगली आवक झाल्याचे दिसून आले. पुणे मांजरी बाजार समिती जुडीला कमीत कमी 19 रुपये तर सरासरी 27 रुपयांचा दर मिळाला. श्रीरामपूर बाजार समिती कमीत कमी 16 रुपये तर सरासरी 21 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर हायब्रीड कोथिंबीरीला कल्याण बाजारात कमीत कमी 20 रुपये तर सरासरी 25 रुपये दर मिळाला.

तर अमरावती, मुंबई बाजार समितीत कोथिंबीरीला क्विंटलमागे 04 हजारांचा सरासरी दर मिळाला. तर कामठी बाजारात 6 हजार तर हिंगणा बाजार समितीत सर्वाधिक 14 हजार रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात जोडीला कमीत कमी दहा रुपये तर सरासरी 15 रुपयांपर्यंत दर मिळाला.

असे आहेत कोथिंबिरीचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/06/2024
अहमदनगर---नग2600233931
अमरावतीलोकलक्विंटल60350050004250
जळगावलोकलक्विंटल39300050004000
कोल्हापूरलोकलनग1000141817
मंबईलोकलक्विंटल664300050004000
नागपूरलोकलक्विंटल2992501025010000
नागपूरहायब्रीडक्विंटल15554060005860
पुणे---नग3933051012681014
पुणेलोकलनग137350132218
रत्नागिरीनं. २नग2300280034003000
सातारा---नग9000152017
सोलापूरलोकलनग9338279687517
ठाणेहायब्रीडनग3203025
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)807
टॅग्स :मार्केट यार्डशेतीपुणेशेती क्षेत्र