Join us

Lemon Market : आज कागदी लिंबाला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 7:32 PM

Limbu Bajarbhav : आज अहमदनगर, धाराशिव, जळगाव, नागपूर, पुणे या बाजार समितीमध्ये (Pune market Yard) लिंबाची आवक झाली.

Lemon Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये लिंबाची (Lemon) 412 क्विंटलची आवक झाली. अहमदनगर, धाराशिव, जळगाव, नागपूर, पुणे या बाजार समितीमध्ये लिंबाची आवक दिसून आली तर आज लिंबाला सरासरी क्विंटल मागे 2200 रुपयापासून 9000 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राहता बाजार समितीत (Rahata Market) लिंबाच्या सर्वसाधारण वाणाची सहा क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 05 हजार रुपये तर सरासरी 06 हजार रुपयांचा दर मिळाला. तर धाराशिव आणि मंचर बाजार समितीत कागदी लिंबाची एकूण 11 क्विंटलची आवक झाली. या लिंबाला धाराशिव बाजारात 4 हजार रुपये तर मंचर बाजारात 6 हजार 200 रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तर आज लोकल लिंबाला पुणे बाजारात 2200 रुपये, पुणे मोशी बाजारात नऊ हजार रुपये, भुसावळ बाजार 6500 तर रामटेक बाजार समितीत 05 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. सर्वाधिक दर हा पुणे मोशी बाजार समितीत मिळाल्यास दिसून आले. 

असे आहेत लिंबाचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/06/2024
अहमदनगर---क्विंटल6500070006000
धाराशिवकागदीक्विंटल8300050004000
जळगावलोकलक्विंटल88600070006500
नागपूरलोकलक्विंटल10500060005500
पुणेलोकलक्विंटल297420070005600
पुणेकागदीक्विंटल3500070006200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)412
टॅग्स :शेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे