Join us

Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 5:33 PM

Onion Market :आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 30 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वसाधारण कांद्यासह लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 2250 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. यात अहमदनगर, धाराशिव, जळगाव, नागपूर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा समावेश आहे. आज सर्वसाधारण कांद्याला (Onion Market) दौंड - केडगाव बाजारात 2600रुपये, तर रा बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याची पुणे बाजारात 12 हजार क्विंटलची आवक झाली तर 2100 रुपये तर मिळाला. तसेच पुणे - पिंपरी बाजारात 2150 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याची (red onion Price) केवळ 30 क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला धाराशिव बाजारात 2800 रुपये, भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची 9 हजार 500 क्विंटलची आवक झाली. तर लासलगाव - निफाड बाजारात 2801 रुपये, अकोले बाजारात 2661 रुपये, पारनेर बाजारात 2650 रुपये, तर रामटेक बाजारात सर्वाधिक 4100 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/07/2024
दौंड-केडगाव---क्विंटल3785170032002600
राहता---क्विंटल405050032002500
धाराशिवलालक्विंटल18260030002800
भुसावळलालक्विंटल12230027002500
पुणेलोकलक्विंटल12630120030002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13150028002150
पुणे-मोशीलोकलक्विंटल445200030002500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1120180029112801
अकोलेउन्हाळीक्विंटल78870030002661
पारनेरउन्हाळीक्विंटल7559100031002650
रामटेकउन्हाळीक्विंटल24400042004100
टॅग्स :कांदापुणेमार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र