Join us

Tomato Market : लोकल टोमॅटो सर्वाधिक दर, आज कुठे-काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 8:22 PM

इतर टोमॅटोच्या तुलनेत लोकल टोमॅटोला समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 18 हजार 307 क्विंटल इतकी आवक झाली. यात वैशाली टोमॅटोची 900 क्विंटलची आवक झाली. तर आज टोमॅटोला सरासरी 1100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. इतर टोमॅटोच्या तुलनेत लोकल टोमॅटोला समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

आज 25 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 1 हजार रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र अहमदनगर, चंद्रपूर - गंजवड, श्रीरामपूर बाजार समितीत हजार रुपयांच्या खाली दर मिळाला. तर कळमेश्वर बाजार समितीत हायब्रीड टोमॅटोला 1320 रुपयांचा दर मिळाला. लोकल टोमॅटोला सरासरी 1000 रुपये ते 3500 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. यात अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटला 1600 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, पेन बाजारात 2200 रुपये असा दर मिळाला. तर मंगळवेढा बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. 

दरम्यान आज वैशाली टोमॅटोला सरासरी 1000 रुपयापासून ते 1875 रुपये दर मिळाला. यात सोलापूर बाजार समितीत सरासरी 1500 रुपये, जळगाव बाजार समितीत 1600 रुपये, नागपूर बाजार समितीत 1875 रुपये, कराड निफाड बाजार समिती 1000 रुपये, भुसावळ बाजार समितीत 2000 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/05/2024
कोल्हापूर---क्विंटल37580023001600
अहमदनगर---क्विंटल2122001500850
पुणे-मांजरी---क्विंटल729100016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल11080012001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल5425001000800
खेड-चाकण---क्विंटल212150020001800
श्रीरामपूर---क्विंटल218001000900
राहता---क्विंटल2050025001500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल20101015001320
अकलुजलोकलक्विंटल2250013001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल99140018001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16100012001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल373100020001500
नागपूरलोकलक्विंटल100180025002250
चांदवडलोकलक्विंटल1650019001250
पेनलोकलक्विंटल381220024002200
वाईलोकलक्विंटल70100025001800
मंगळवेढालोकलक्विंटल35180042003500
कामठीलोकलक्विंटल30150025002000
सोलापूरवैशालीक्विंटल31730024001500
जळगाववैशालीक्विंटल62100022001600
नागपूरवैशालीक्विंटल500150020001875
कराडवैशालीक्विंटल10570010001000
भुसावळवैशालीक्विंटल20150025002000
टॅग्स :टोमॅटोशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड