Join us

रविवारच्या दिवशी लाल हरभऱ्याची आवक, कुठे काय बाजारभाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 7:06 PM

रविवार असल्याने आज राज्यातील मोजून पाच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक झाली.

आज केवळ लाल हरभऱ्याची आवक झाल्याचे बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाले. राज्यातील मोजून पाच बाजार समित्यांमध्ये आज हरभऱ्याची आवक झाली. आजच्या बाजारभावानुसार लाल हरभऱ्याला 5 हजार रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव मिळाला. तर सर्वसाधारण हरभऱ्याला सर्वाधिक 7300 रुपये दर मिळाला. मात्र इतर दिवसांच्या तुलनेत आज सर्वसाधारण हरभऱ्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज 17 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सिल्लोड, शेवगाव, वरोरा-शेगाव, दौंड, औसा या बाजार समित्यांमध्ये लाल हरभऱ्याची आवक झाली. सिल्लोड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण हरभऱ्याची 83 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी सर्वाधिक 7 हजार 300 रुपये बाजारभाव मिळाला. शेवगाव बाजार समितीमध्ये लाल हरभऱ्याला सरासरी 5400 रुपये दर मिळाला. वरोरा-शेगाव बाजार समितीमध्ये लाल हरभऱ्याला सरासरी 5000 रुपये दर मिळाला. दौंड बाजार समितीमध्ये लाल हरभऱ्याला सरासरी 5500 रुपये दर मिळाला. औसा बाजार समितीमध्ये लाल हरभऱ्याला सरासरी 5723 रुपये दर मिळाला. 

आज रविवार, आजचे हरभरा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/03/2024
सिल्लोड---क्विंटल83530095007300
शेवगावलालक्विंटल18540054005400
वरोरा-शेगावलालक्विंटल310280052005000
दौंडलालक्विंटल1550055005500
औसालालक्विंटल863540160005723
टॅग्स :शेतीमार्केट यार्डपीकमहाराष्ट्र