अनेक शेतकरीशेतीसोबतपशुधन वाढवत आहेत. अनेकजण शेतीपूरक व्यवसायासाठी पशुधनाचा वापर करत असतात. शिवाय सध्याच्या परिस्थितीत आधुनिक अवजारांच्या साहाय्याने शती केली जात असली तरीही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात पशुधन हे असतेच. यातही काही शेतकरी नव्या पशुधनाच्या शोधात असतात. कुणी शेतीसाठी तर कुणी दुधासाठी नवे पशुधन खरेदी करत असते. याच पार्श्वभूमीवर आपण पशुधनाचे बाजारभाव समजून घेऊया.
राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कल्याण बाजारात हायब्रीड (क्रॉस ब्रीड) म्हशीला कमीत कमीत 70 हजार तर सरासरी 80 हजार रुपयांचा बाजार मिळाला. तर 2 फेब्रुवारीला देखील साधारण असाच भाव मिळाला. तर कल्याण बाजारात रेड्याला कमीत कमी 10 हजार तर सरासरी 15 हजार बाजार मिळाला. तर हायब्रीड (क्रॉस ब्रीड) गाईला कमीत कमी 45 हजार तर सरासरी 55 हजर रुपये बाजार मिळाला. तर कालवडीला आज कल्याण बाजारात कमीत कमी दर 30 हजार रुपये तर सरासरी 34 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तर 2 फेब्रुवारीला कालवडीला आजच्या इतका बाजार मिळाला. खामगाव बाजारात बोकडाला कमीत कमी 4 हजार तर सरासरी 7 हजार रुपये बाजार मिळाला.
असे आहेत पशुधनाचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/02/2024 | ||||||
कल्याण | हायब्रीड | नग | 3 | 45000 | 60000 | 55000 |
कल्याण | लोकल | नग | 3 | 38000 | 45000 | 40000 |