Lokmat Agro >बाजारहाट > Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय? 

Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय? 

Latest News Today's market price of red-summer onion in maharashtra | Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय? 

Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय? 

आज सहा डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 3950 रुपये इतका दर मिळाला.

आज सहा डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 3950 रुपये इतका दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

आज सहा डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 3950 रुपये इतका दर मिळाला. तर उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 3900 इतका दर मिळाला. म्हणजेच कालच्या बाजारभावापेक्षा आज लाल कांद्याचा बाजारभाव शंभर रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. तर उन्हाळ कांद्याचा कालचा सरासरी दर 3800 इतका होता, आज त्यातही शंभर रुपयांची वाढ होऊन 3900 वर गेला. 

दरम्यान अवकाळी पावसांनंतर आवक घटल्याने कांदा बाजारभावात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आज लासलगाव बाजार समितीमध्ये 3675 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर उन्हाळ कांद्याची 2700 क्विंटल इतकी आवक झाली. कालची आकडेवारी पाहिली असता काल लाल कांद्याची आवक 4472 क्विंटल इतकी झाली होती. तर उन्हाळ कांद्याची 3 हजार 298 क्विंटल झाली होती. यानुसार आज लाल कांद्याची आवक घटली. तर उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. तरीही दोन्ही कांद्याच्या बाजारभाव शंभर रुपयांनी वधारल्याचे दिसून आले. 

नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्याचा बाजारभाव


येवला बाजार समितीत लाल कांद्याची 2200 क्विंटल आवक झाली तर या ठिकाणी कमीत कमी आठशे रुपये क्विंटल दर मिळाला. तर जास्तीत जास्त 4 हजार 60 रुपये दर मिळाला आणि सरासरी तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल मागे दर मिळाला. तर दुसऱ्या बाजूला मालेगाव मुंगसे बाजार समितीत लाल कांद्याची दहा हजार पाचशे क्विंटल इतकी आवक झाली तर या ठिकाणी चौदाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर जास्तीत जास्त चार हजार 67 इतका दर मिळाला. तर सरासरी 3200 रुपये इतका दर मिळाला. सिन्नर बाजार समितीत 520 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. या ठिकाणी प्रतिक्विंटल मागे एक हजार रुपये कमीत कमी दर मिळाला. तर जास्तीत जास्त दर 4 हजार दोनशे रुपये मिळाला आणि सरासरी 3600 रुपये इतका दर मिळाला. देवळा बाजार समितीत लाल कांद्याचे तीन हजार 150 क्विंटल झाली तर कमीत कमी दर 500 रुपये प्रति क्विंटल होता तर जास्तीत जास्त दर चार हजार 95 रुपये क्विंटल होता तर सरासरी दर तीन हजार पाचशे रुपये इतका होता. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याची 5500 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी दर 951 रुपये प्रति क्विंटल मिळाला जास्तीत जास्त दर 4120 मिळाला तर सरासरी 3500 रुपये इतका दर मिळाला.


नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याचे बाजार भाव

येवला बाजार समितीत 2200 उन्हाळी कांद्याचे आवक झाली तर कमीत कमी दर पंधराशे रुपये प्रतिक्विंटल होता. जास्तीत जास्त दर चार हजार 151 रुपये तर सरासरी तीन हजार पाचशे रुपये दर होता. मालेगाव मुंगसे बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 4500 क्विंटल इतकी आवक झाली होती. तर कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल होता. तर जास्तीत जास्त जर 4141 इतका होता तर सरासरी 3400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 2250 क्विंटल इतकी आवक झाली होती. तर कमीत कमी 1000 रुपये प्रति क्विंटल मागे दर मिळाला. जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक रुपये दर होता. तर सरासरी 3800 रुपये दर मिळाला. देवळा बाजार समितीत 3400 क्विंटल उन्हाळ कांद्याचे आवक झाली होती. या कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये इतका दर मिळाला तर जास्तीत जास्त 4145 रुपये भाव मिळाला. तर सरासरी तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---क्विंटल4441150048003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570200043003150
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12257300046003800
खेड-चाकण---क्विंटल1500300040003500
सातारा---क्विंटल170200045003500
हिंगणा---क्विंटल2250025002500
बारामतीलालक्विंटल439140050003500
येवलालालक्विंटल220080040603400
येवला -आंदरसूललालक्विंटल800210038523600
लासलगावलालक्विंटल3675250045153950
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4500200042003800
जळगावलालक्विंटल1634112533872500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल10500140040673200
नागपूरलालक्विंटल1000250040003625
सिन्नरलालक्विंटल520100042003600
मनमाडलालक्विंटल1500100040503550
पारनेरलालक्विंटल6193100045003000
देवळालालक्विंटल315050040953500
उमराणेलालक्विंटल550095141203500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल480160042002900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल452590042002550
पुणेलोकलक्विंटल9848220048003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल1350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3460046004600
मंगळवेढालोकलक्विंटल31950042003400
कल्याणनं. १क्विंटल3450055005000
नागपूरपांढराक्विंटल540300040003750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल14400100047003700
येवलाउन्हाळीक्विंटल2200150041513500
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल1200130037613700
लासलगावउन्हाळीक्विंटल1530200042003900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल4500130041413400
कळवणउन्हाळीक्विंटल2700175047453300
मनमाडउन्हाळीक्विंटल810150038603500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2250100043013800
भुसावळउन्हाळीक्विंटल7300035003300
देवळाउन्हाळीक्विंटल3400150041453700
उमराणेउन्हाळीक्विंटल4000100042003700

Web Title: Latest News Today's market price of red-summer onion in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.