आज रविवार असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. त्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्ये आज शेतमालाची आवक झाल्याचे पाहायला मिळाले. आज तूर, सोयाबीन, ज्वारीची अगदी कमी आवक झाली आहे. आजच्या बाजारभावानुसार तुरीला सरासरी 9 हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 3500 रुपये दर मिळाला. तर ज्वारीला 2610 रुपये सरासरी दर मिळाला.
आज 17 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तुरीची 83 क्विंटल आवक झाली. यात वरोरा-शेगाव, औसा, शेवगाव या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांमध्ये लाल आणि पांढऱ्या तुरीची आवक झाली. वरोरा-शेगाव बाजार समितीत लाल तुरीला सरासरी 8500 रुपये बाजारभाव मिळाला. शेवगाव बाजार समितीत पांढऱ्या तुरीची 14 क्विंटल आवक झाली. तर सरासरी 9000 रुपये दर मिळाला. तर औसा बाजारसमितीत लाल तुरीला 10 हजार 10 रुपये असा सर्वाधिक भाव मिळाला.
तसेच आज सोयाबीनची 1350 क्विंटलची आवक झाली. यात सिल्लोड बाजार समितीमध्ये 8 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर वरोरा-शेगाव आणि औसा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. सिल्लोड बाजार समितीत सर्वसाधारण तुरीला सरासरी 4350 रुपये दर मिळाला. तर वरोरा-शेगाव आणि औसा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी अनुक्रमे 3500 रुपये आणि 4617 रुपये दर मिळाला. केवळ औसा बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला आहे. तर आज दौंड आणि औसा या दोनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक पाहायला मिळाली. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये पांढऱ्या ज्वारीची आवक झाली होती. दौंड बाजार समितीत सरासरी 2800 रुपये आणि औसा बाजार समितीमध्ये 2610 रुपये दर मिळाला.