एकीकडे निर्यात खुली झाल्याची घोषणा झाली असताना अद्यापही शेतकरी संभ्रमात आहेत. कारण ४८ तास उलटूनही नोटिफिकेशन आलेलं नाही. दुसरीकडे दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कांदा बाजारभाव पाहिले असता निर्यात बंदीच्या घोषणेनंतर वाढले होते, मात्र पुन्हा एकदा घसरल्याचे चित्र आहे. आज सकाळ सत्रातील बाजारभाव असे होते की लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सरासरी 8 हजार 500 क्विंटल आवक झाली. तर सरासरी 1650 इतका भाव मिळाला.
रविवारी निर्यात बंदीची घोषणा झाल्यानंतर कांदा बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने बाजार समित्या बंद होत्या. त्यानंतर आज 20 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी 800 तर सरासरी 1650 रुपये इतका भाव मिळाला. येवला -आंदरसूल बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 350 रुपये तर सरासरी 1675 रुपये भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये 10300 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1700 रुपये भाव मिळाला.
मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची 9707 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1850 रुपये भाव मिळाला. पुणे बाजार समितीमध्ये 8226 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1600 रुपये भाव मिळाला. सांगली -फळे भाजीपाला मार्केटमध्ये 750 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1450 रुपये भाव मिळाला.
सकाळ सत्रात असा मिळाला बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
20/02/2024 | ||||||
मुंबई - कांदा बटाटा मार्केट | --- | क्विंटल | 9707 | 1500 | 2200 | 1850 |
खेड-चाकण | --- | क्विंटल | 400 | 1500 | 1800 | 1650 |
येवला -आंदरसूल | लाल | क्विंटल | 5000 | 350 | 1900 | 1675 |
लासलगाव - विंचूर | लाल | क्विंटल | 10300 | 900 | 1901 | 1650 |
कळवण | लाल | क्विंटल | 2900 | 700 | 2000 | 1600 |
मनमाड | लाल | क्विंटल | 3400 | 300 | 1721 | 1500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 750 | 500 | 2400 | 1450 |
पुणे | लोकल | क्विंटल | 8226 | 800 | 2400 | 1600 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 273 | 800 | 1200 | 1000 |
पिंपळगाव बसवंत | पोळ | क्विंटल | 8000 | 500 | 2021 | 1700 |