Join us

कांदा निर्यात खुली झाल्याची चर्चा, आज लासलगावमध्ये बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:31 PM

आजच्या सकाळ सत्रात राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

एकीकडे निर्यात खुली झाल्याची घोषणा झाली असताना अद्यापही शेतकरी संभ्रमात आहेत. कारण ४८ तास उलटूनही नोटिफिकेशन आलेलं नाही. दुसरीकडे दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कांदा बाजारभाव पाहिले असता निर्यात बंदीच्या घोषणेनंतर वाढले होते, मात्र पुन्हा एकदा घसरल्याचे चित्र आहे. आज सकाळ सत्रातील बाजारभाव असे होते की लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सरासरी 8 हजार 500 क्विंटल आवक झाली. तर सरासरी 1650 इतका भाव मिळाला. 

रविवारी निर्यात बंदीची घोषणा झाल्यानंतर कांदा बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने बाजार समित्या बंद होत्या. त्यानंतर आज 20 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी 800 तर सरासरी 1650 रुपये इतका भाव मिळाला. येवला -आंदरसूल बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 350 रुपये तर सरासरी 1675 रुपये भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये 10300 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1700 रुपये भाव मिळाला.         

मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची 9707 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1850 रुपये भाव मिळाला. पुणे बाजार समितीमध्ये 8226 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1600 रुपये भाव मिळाला. सांगली -फळे भाजीपाला मार्केटमध्ये  750 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1450 रुपये भाव मिळाला.               

सकाळ सत्रात असा मिळाला बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/02/2024
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9707150022001850
खेड-चाकण---क्विंटल400150018001650
येवला -आंदरसूललालक्विंटल500035019001675
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1030090019011650
कळवणलालक्विंटल290070020001600
मनमाडलालक्विंटल340030017211500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल75050024001450
पुणेलोकलक्विंटल822680024001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल27380012001000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल800050020211700
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक