Join us

Onion Market : उन्हाळ कांदा घसरला, आजचे सकाळ सत्रातील कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 1:29 PM

आजच्या सकाळ सत्रामध्ये आवकेत वाढ झाली असून जवळपास 50 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली.

आजच्या सकाळ सत्रामध्ये आवकेत वाढ झाली असून जवळपास 50 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. कांद्याला समाधान कारक भाव मिळत आवक वाढत असल्याचे चित्र आहे. आजच्या सकाळ सत्रातील बाजार अहवालानुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक 17 हजार क्विंटलची आवक झाली. तर सकाळ सत्रातील सरासरी 1400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. 

आज 13 मार्च रोजी राज्यातील  काही निवडक बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले आहेत. यात लासलगाव, पुणे, कामठी, कल्याण, पिंपळगाव बाजरी समित्यांमध्ये लाल कांदयासह उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1550 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज दरात घसरण झाल्याचे बघायला मिळाले. तर पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1650 दर मिळाला. कल्याण बाजार समितीमध्ये नंबर एकच्या कांद्याला 1850 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सकाळ सत्रातील दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/03/2024
अकलुज---क्विंटल35530021001200
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1030070018001650
मनमाडलालक्विंटल300040016351500
पुणेलोकलक्विंटल1743560018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140016001500
कामठीलोकलक्विंटल43150025002000
कल्याणनं. १क्विंटल3170020001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल800050018991750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000120018441650

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक