Join us

Onion Market : आज धुलिवंदन, लासलगाव -विंचूर बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 5:46 PM

आज जवळपास 16 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक झाली. 

राज्यातील अनेक बाजार समित्यांना आज धुलीवंदनाची सुट्टी असल्याने लिलाव बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलाव देखील बंद आहेत. मात्र काही निवडक बाजारसमित्यामध्ये आज कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार आज कांद्याला सरासरी 1200 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

आज 25 मार्च रोजी धूलिवंदन असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. आज सोलापूर, विटा, पुणे -पिंपरी, वाई, मंगळवेढा, लासलगाव - विंचूर, पिंपळगाव बसवंत आदी बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. यात केवळ लोकल आणि उन्हाळ कांद्याचीच आवक झाली. या चार ते पाच बाजार समित्या मिळून  जवळपास 16 हजाराहून अधिक  क्विंटल कांद्याची आवक झाली. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली.  सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1100 दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1380 रुपये दर मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. पुणे -पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1500 रुपये दर  मिळाला.  विटा बाजार समितीत सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/03/2024
विटा---क्विंटल3080015001250
सोलापूरलालक्विंटल795720020001100
बारामतीलालक्विंटल26030016001100
राहूरी -वांबोरीलालक्विंटल63920017001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2150015001500
वाईलोकलक्विंटल25080015001200
मंगळवेढालोकलक्विंटल9420015001250
नाशिकउन्हाळीक्विंटल136355015801350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल285070015001400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल300040014321380
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिकसोलापूर