Join us

Kanda Market : कांदा दरात घसरण, राज्यातील कुठल्या बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:09 PM

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक झाली.

Todays Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक झाली. लाल कांद्याला आज 1812 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर कुर्डूवाडी-मोडनिंब बाजार समिती सर्वाधिक 3450 रुपयांचा सरासरी दर मिळाला. उन्हाळ कांद्याला सरासरी 1975 पासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ कांदा (Summer Onion) दरात सातत्याने घसरण होत आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाळ कांद्याची 74 हजार 238 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 8979 क्विंटलची आवक झाली. यात येवला बाजारात 2550 रुपये, नाशिक बाजारात 2500 रुपये, लासलगाव बाजारात 2675 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, संगमनेर बाजारात 1975 रुपये, चांदवड बाजार 2650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2750 रुपये तर दिंडोरी बाजारात 2530 रुपयांचा दर मिळाला.

आज सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजारात 2300 रुपये, अकोला बाजारात २५०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1705 रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2650 रुपये दर मिळाला. लाल कांद्याची सोलापूर बाजारात 18,121 क्विंटलची आवक झाली.  या बाजारात 2500 रुपये, बारामती बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 1812 रुपये, तर साक्री बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/07/2024
अहमदनगरनं. १क्विंटल909240031002550
अहमदनगरनं. २क्विंटल1209180023002150
अहमदनगरनं. ३क्विंटल89250017001450
अहमदनगरउन्हाळीक्विंटल897975029762188
अकोला---क्विंटल237150030002500
चंद्रपुर---क्विंटल370300040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल182556028501705
धुळेलालक्विंटल4460200027502650
जळगावलोकलक्विंटल650220026752500
जळगावलालक्विंटल49192127001812
कोल्हापूर---क्विंटल5154100033002300
मंबई---क्विंटल12735240029002650
नागपूरलोकलक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल9150027002100
नाशिकउन्हाळीक्विंटल74238122228412631
पुणे---क्विंटल483245030502750
पुणेलोकलक्विंटल9433156728672217
पुणेलालक्विंटल39490030002200
सांगलीलोकलक्विंटल4170100030002000
सातारा---क्विंटल75200030002500
साताराहालवाक्विंटल99100030003000
सोलापूरलोकलक्विंटल121180032253000
सोलापूरलालक्विंटल18124177633752975
ठाणेनं. १क्विंटल3280032003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)145070
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती