Join us

Onion Market : कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:38 PM

kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 67 हजार 334 क्विंटल च्या आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 67 हजार 334 क्विंटल च्या आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 85 हजार 699 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 14815 क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी 1678 रुपयांपासून ते 2801 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आजचे सविस्तर बाजार भाव पाहिले असता सर्वसाधारण कांद्याची मुंबई कांदा बटाटा मार्केट, कोल्हापूर, दौंड केडगाव, राहता बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली. या कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 26 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज हायब्रीड कांद्याला फलटण बाजारात 2500 रुपये दर मिळाला. आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2500 रुपये, धुळे बाजारात 02 हजार रुपये, जळगाव बाजारात 1550 रुपये, तर नागपूर बाजारात 2750 रुपये दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला अंदरसुल बाजारात 2575 रुपये, नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजारात 2700 रुपये अकोले बाजार 2665 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, कोपरगाव बाजारात 2600 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2725 रुपये, तर दिंडोरी-वणी बाजारात 2801 रुपये दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/07/2024
अहमदनगर---क्विंटल501750031002400
अहमदनगरलोकलक्विंटल18150031001800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1481592528842401
अकोला---क्विंटल243180030002500
अमरावतीलोकलक्विंटल100320036003400
बुलढाणालोकलक्विंटल185100026002000
चंद्रपुर---क्विंटल283300040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल934130029002100
धुळेलालक्विंटल4867105026432300
जळगावलालक्विंटल263135023751875
कोल्हापूर---क्विंटल4171100033002300
मंबई---क्विंटल6756240029002650
नागपूरलोकलक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल1800200030002750
नागपूरपांढराक्विंटल1000220032003150
नाशिकउन्हाळीक्विंटल85699118028842680
पुणे---क्विंटल3495175030502050
पुणेलोकलक्विंटल12058178029402370
पुणेचिंचवडक्विंटल6125110032102800
सांगलीलोकलक्विंटल2263100030002000
सातारा---क्विंटल109200030002500
साताराहायब्रीडक्विंटल1778100029002500
साताराहालवाक्विंटल99150030003000
सोलापूरलालक्विंटल1508030032002500
ठाणेनं. १क्विंटल3280032003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)167334
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती