कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून आणखी तीन देशांमध्ये कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र खूपच कमी कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कांदा बाजारभाव काहीसा सुधार पाहायला मिळतो आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1870 रुपये बाजारभाव मिळाला आहे. काल याच बाजारसमितीत 2180 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला होता.
आज 08 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सकाळपासून आतापर्यंत 57 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील दोन तीन दिवसांपासून उन्हाळ कांद्याची आवक वाढत असून आज लाल, उन्हाळ, लोकल कांद्यासोबत चिंचवड कांद्याची देखील आवक झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर सरासरी 1200 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. आजच्या दिवसातील सर्वाधिक 17 हजार क्विंटलची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली. सर्वात कमी आवक पुणे -पिंपरी बाजार समितीत केवळ 2 क्विंटलची आवक झाली आहे. अजून सायंकाळपर्यंत आवक होणार असल्याने आवक वाढण्याची शक्यता आहे.
लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 212 वाहने तर उन्हाळ कांद्याची 115 वाहनांची आवक झाली. दोन्ही मिळून जवळपास 6 हजार 282 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी उन्हाळ कांद्याला सरासरी 1870 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1810 रुपयांचा बाजारभाव मिळाला. आजच्या दिवसातील सर्वाधिक 1921 रुपयांचा बाजारभाव हा लाल कांद्याला लासलगाव - निफाड बाजार समितीत मिळाला. तर सर्वात कमी म्हणजेच सरासरी 850 रुपयांचा बाजारभाव पुणे मोशी बाजार समितीत मिळाला आहे.
असे आहेत कांदा बाजारभाव..
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
08/03/2024 | ||||||
कोल्हापूर | --- | क्विंटल | 4529 | 600 | 1900 | 1200 |
खेड-चाकण | --- | क्विंटल | 150 | 1300 | 1800 | 1500 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 11364 | 1000 | 2350 | 1400 |
लासलगाव - निफाड | लाल | क्विंटल | 830 | 1050 | 1970 | 1921 |
संगमनेर | लाल | क्विंटल | 679 | 200 | 2000 | 1100 |
मनमाड | लाल | क्विंटल | 1500 | 400 | 1948 | 1700 |
पारनेर | लाल | क्विंटल | 14090 | 300 | 2000 | 1375 |
पुणे | लोकल | क्विंटल | 17182 | 600 | 1800 | 1200 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 2 | 1500 | 1600 | 1550 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 340 | 500 | 1200 | 850 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 58 | 200 | 1500 | 1300 |
लासलगाव - निफाड | उन्हाळी | क्विंटल | 250 | 1151 | 1921 | 1821 |
संगमनेर | उन्हाळी | क्विंटल | 6120 | 200 | 2000 | 1100 |