Join us

Onion Market : ईदला कांद्याचा बाजारभाव कसा राहिला? जाणून घ्या आजचे सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 5:48 PM

आज ईदच्या दिवशी काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले आहेत. बाजारभाव पाहुयात..

आज देशभरात ईदचा उत्साह असून अनेक बाजार समित्यांना सुट्टी आहे. त्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले आहेत. आज राज्यभरात कांद्याची आवक घटली असून केवळ 31 हजार 846 क्विंटल आवक झाली आहे. तर आज कांद्याला सरासरी 1000 रुपयांपासून ते 1300 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. विशेष म्हणजे आज आवक घटण्याबरोबर दरातही घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज 11 एप्रिल 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात निवडक बाजार समित्यामध्ये लाल, लोकल, उन्हाळ कांद्याचे लिलाव पार पडले. यात सर्वाधिक 10 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक लोणंद बाजार समितीत झाली. त्या खालोखाल पुणे, लासलगाव - विंचूर या बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली. यात पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. 

जुन्नर बाजार समितीत चिंचवड कांद्याला सरासरी केवळ 900 रुपये दर मिळाला. धाराशिव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांदा दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/04/2024
जुन्नरचिंचवडक्विंटल16295001700900
धाराशिवलालक्विंटल5100015001250
भुसावळलालक्विंटल16100015001200
पुणेलोकलक्विंटल982560016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल23100016001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल11955001400950
शेवगावनं. १नग500110015001100
शेवगावनं. २नग66060010001000
शेवगावनं. ३नग410250500500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल820070015211400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल93120016001000
लोणंदउन्हाळीक्विंटल1000090015511200
टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिकईद ए मिलाद