Join us

पुणे बाजार समितीत कांदा घसरला, असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:20 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये सकाळ सत्रात 46 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली.

आज सकाळ सत्रात  समित्यांमध्ये लालसह उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1280 रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1380 रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज पुन्हा लाल कांद्याच्या शंभर रुपयांची तर उन्हाळ कांद्याच्या दरात 60 रुपयांची घसरण झाली आहे. 

आज 22 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये सकाळ सत्रात 46 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. सकाळी सर्वाधिक 13704 कांद्याची आवक मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये झाली. तर पुणे बाजार समितीत देखील 13 हजार क्विंटलची आवक झाली. पुणे बाजार समितीत दाखल झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये दर मिळाला. 

कळवण बाजार समिती उन्हाळ कांद्याची 7 हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1100 रुपये मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सरासरी 1375 रुपये दर मिळाला. 

सकाळचे कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/03/2024
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13704110016001350
लासलगावलालक्विंटल22178113391280
कळवणलालक्विंटल425100014051100
पुणेलोकलक्विंटल1304450015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7120015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल2755001000750
वाईलोकलक्विंटल12130015001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल139130013511150
लासलगावउन्हाळीक्विंटल455670015511380
कळवणउन्हाळीक्विंटल770040015501100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल726030016151375
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिकपुणे