Join us

Onion Market : सकाळ सत्रात कांद्याची आवक घटली, लाल कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 2:50 PM

आजच्या सकाळ सत्रामध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला, हे समजून घेऊयात..

आज सकाळ सत्रात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. कारण दोन वाजेपर्यंत एक लाख क्विंटलपर्यंत कांद्याची आवक झाली होती. आज केवळ 60 हजार क्विंटल झाली आहे. सकाळ सत्रात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. तर काही निवडक बाजार समित्यांमध्ये समाधानकारक दर मिळाला. 

आज 19 मार्च रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत 42 नग कांद्याची आवक झाली. त्यांनतर पुणे 16 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. तर पिंपळगाव बाजार समितीत आज देखील सर्वाधिक 7 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1200 रुपये दर मिळाला. मात्र पेन बाजार समितीत 1800 रुपये दर मिळाला. कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 2000 रुपये दर मिळाला.  मात्र याउलट नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खूपच कमी दर मिळाल्याचे दिसून आले. 

असे आहेत सकाळ सत्रातील दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/03/2024
कोल्हापूर---क्विंटल356650015001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3124001300450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9460110016001350
खेड-चाकण---क्विंटल200120016001400
सातारा---क्विंटल250100015001250
येवला -आंदरसूललालक्विंटल50040012761150
सिन्नर - नायगावलालक्विंटल29050015001300
कळवणलालक्विंटल7502501235850
पेनलालक्विंटल432180020001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल307140019001150
पुणेलोकलक्विंटल168344001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल6835001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200110014001280
कामठीलोकलक्विंटल6150025002000
कल्याणनं. १क्विंटल3130016001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल200030014251250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150030013511275
कळवणउन्हाळीक्विंटल550040015001001
चांदवडउन्हाळीक्विंटल600051114191200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015611400
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल6756125117001485
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिक