Join us

Onion Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 6:10 PM

Kanda Bajarbhav : आज आषाढी एकादशीच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Market : आज आषाढी एकादशी (Ashadhi Eakadshi) असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 44 हजार 281 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला (Onion Market) सरासरी 1875 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Kanda Market) कोल्हापूर बाजारात 2447 क्विंटल तर खेड चाकण बाजारात 900 क्विंटलचे आवक झाली. यात कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, तर खेड चाकण बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याची अवघी 458 क्विंटलची आवक झाली. यात बारामती बाजार समिती 2300 रुपये तर भुसावळ बाजार समिती सर्वाधिक 03 हजार रुपयांचा दर मिळाला.

तर आज पुणे बाजारात लोकल कांद्याची 6 हजार 753 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला 2150 रुपये तर मंगळवेढा बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2850 रुपये, पारनेर बाजार समितीत 2525 रुपये, तर वैजापूर बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याची 28 हजार क्विंटलची आवक झाली.

असे आहेत बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/07/2024
कोल्हापूर---क्विंटल2447100032002200
खेड-चाकण---क्विंटल900200030002500
बारामतीलालक्विंटल45450030002300
भुसावळलालक्विंटल3250030003000
पुणेलोकलक्विंटल6753120031002150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15250029002700
मंगळवेढालोकलक्विंटल62130033003000
नाशिकउन्हाळीक्विंटल151170030502600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6130100031002850
संगमनेरउन्हाळीक्विंटल298540033511875
पारनेरउन्हाळीक्विंटल8983100032002525
वैजापूरउन्हाळीक्विंटल8938120028502650
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रआषाढी एकादशीशेतीनाशिक